का टा वृत्तसेवा Iसंजय गणोरकर नागपूर : मोहपा येथील ‘क्रांतिसुर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ च्या सहयोगाने शासकिय सेवेत रुजू झालेले तसेच वर्ग १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल 15 जुन ला स्थानिक गजानन महाराज सभागृहात संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी प्राचार्य प्रकाश आदमने, प्रमुख अतिथीत यशस्वी उद्योजक किशोर कन्हेरे, माजी नगराध्यक्ष इमेश्वर यावलकर व शोभाताई कौटकर, माजी न. प. उपाध्यक्ष माधव चर्जन हे होते. मोहपा हे तसे कळमेश्वर तालुक्यात कमी लोकसंख्या असलेले लहान शहरासारखे गांव असले तरी शैक्षणिकदृष्टया प्रगत आहे. येथील शाळा काॅलेजातून शिकणाऱ्या अनेकांनी आपल्या आयुष्यात उंच भरारी घेउन गावाचा मोठा नावलौकीक केला आहे. यांतून आपली सामाजीक जबाबदारीच्या जाणिवेतून काही परोपकारी तरूणांनी सन 2012 पासून ‘क्रांतीसुर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ ही अभ्यासिका व ग्रंथालय सुरू केले आहे. ज्याचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. संस्थेकडून फटाके व प्रदुषणमुक्त दिवाळी, वृक्ष दिंडी, रक्तदान, स्वच्छता मोहीम यासारखे समाज प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात.
‘क्रांतीसुर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ मधील अनेक विद्यार्थी शासकिय व निम शासकिय सेवेत रुजू झालेले आहेत. त्यात तेजराम वऱ्हाडे हे युनियन बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. विक्रांत लिखारे यांची भारतीय अंतराळ संस्थेमध्ये निवड झालेली असून ते सध्या सहायक लोको-पायलट पदावर कार्यरत आहे. तसेच कुणाल सहारे नॅशनल फर्टीलायझर मध्ये कार्यरत आहेत. किशोर खाटीक हे जलसंपदा विभागात कार्यरत आहे. अश्विन बांबल हे सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती व वैभव आनडे यांस महसूल सेवक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. शुभम शेंडे व विशाल मसने हे पोलीस विभागात तर शुभम गणोरकर हे जिल्हा परिषदेला शिक्षण विभागात नोकरित रूजू झाले आहेत. यज्ञेश वाघ आणि रफिक हनीफ पठाण हे जिल्हा सत्र न्यायालय मध्ये कार्यरत आहे. नितीन साठे हे रेल्वे विभागात कार्यरत आहेत. संस्थेतील विद्यार्थी आज मंत्रालयापासून महसूल विभागा पर्यंत कार्यरत आहेत. कु. विजया नंदकिशोर केवटे, कु. पूर्वा संजय बेदरकर व दिपांशू संजय अखंड या विद्यार्थ्यांनी एचएससी परीक्षेत विज्ञान शाखेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. यांनी ‘क्रांतीसुर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ चा उपयोग केला आहे. तसेच कु. अनुजा रमेश टेकाडे व कु. धनश्री युवराज खरबडे यांनी कला शाखेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय तसेच रोहित दानव व समीर शंकर पाटील यांनी वाणिज्य शाखेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक संपादीत केेला आहे. कु. धनश्री युवराज खरबडे हिने राज्यशास्त्र विषयात 100 पैकी 99 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. एसएससीत रोहन बबन पाटील व कु. श्रीकांत डांगोरे प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळी माजी नगरसेवक श्रीकांत येणुरकर, विजय वानखडे, न्यू इंग्लिश हायस्कूल ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य समशूद्धीन शेख, गजानन महाराज मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा डांगोरे यांनी केले. प्रास्ताविक डाॅ. प्रशांत महाजन, संस्थेचे अध्यक्ष यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव श्वेतल लोणारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश बोबडे, शैलेश बंसोड, प्रदिप विघ्ने, आशिष रेवतकर, राहुल श्रीखंडे, राहुल गहुकर, महेश कडवे, कुणाल सहारे, निलेश गुळांदे तसेच नविनकुमार गंभिरवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.