सॉफ्टवेअर इंजिनिअरने जुगारात गमावले होते 23 लाख
नागपूर : सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि उज्वल भवितव्य असलेला एक उच्चशिक्षित तरुण जुगाराच्या व्यसनात अडकून अट्टल घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. एकेकाळी चांगल्या कंपनीत नोकरी करणारा इंजिनिअर तरुण चक्क चोऱ्या करायला लागला. धंतोली पोलिसांनी या चोरट्या इंजिनिअरला अटक केल्यानंतर हे उघडकीस आले. त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आशिष रेड्डीमल्ला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आशिष रेड्डीमल्ला याने एम. टेक. झाल्या नंतर नागपूर व पुण्याच्या नामांकीत आयटी कंपनीत नोकरी केली. दरम्यान त्याला वाईट संगत लागली. त्यातूनच त्याला जुगाराचे व्यसन लागले. पगारासह जमा केलेले पैसेही त्याने जुगारात उडवले. नागपुरातील नोकरीच्या काळात तो नागपुरातील धंतोली पोलिसांनी अटक केली. पोलिसी खाक्या दाखवल्या नंतर त्याने शहरातील अनेक चोऱ्या आणि घरफोड्यांची कबुली दिली. छत्रपती नगर भागात राहात होता. त्यामुळे त्याला या परिसराची माहिती होती. शक्यतो एकट बंगल्यांची रेकी करून तो चोरी करीत असे.
धंतोली परिसरात राहणाऱ्या शीतल चिंतलवार यांच्या घरात चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा स्केच तयार करण्यात आला आणि गुपित… पोलिस तपासात असे दिसून आले की आशिषने जुगारात २३ लाख रुपये गमावले होते. कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. चोरी करण्यासाठी तो चंद्रपूरहून नागपूरला बसने येत असे. रिकामी घरे चिन्हांकित करत असे आणि नंतर गुन्हा करत असे. आरोपीला अटक केल्यानंतर धंतोली पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.