February 7, 2026 9:57 am

Executive Assistant (BMC) : बृहन्मुंबई महानगरपालिकेत कु. शिवानी अतकर हिची कार्यकारी सहाय्यक पदावर निवड

महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केला शिवानीचा सत्कार

नागपूर : कु. शिवानी दशरथ अतकर हिची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कार्यकारी सहाय्यक या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत कु. शिवानीने यशस्वी कामगिरी आहे.
                        शिवानी हिने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत बी.एससी. (कंप्यूटर सायन्स) ही पदवी प्राप्त करून राज्यशास्त्रात एम.ए. केले आहे. शिवानी यांची ही निवड त्यांच्या कर्तृत्वाची आणि चिकाटीची साक्ष देणारी आहे.
                        शिवानीच्या या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षक वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या वतीने शिवानीचा सत्कार करण्यात आला असून तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

1
0

Leave a Reply

Realted News