कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने, यांची तडकाफडकी बदली

विकास बिक्कड, कळमेश्वरचे नवे तहसीलदार

का टा वृत्तसेवा
कळमेश्वर : जिल्ह्यातील बेला येथील अप्पर तहसीलदार विकास बिक्कड यांची कळमेश्वर येथेतहसीलदार म्हणून बदली झाली असून, कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने, यांची नागपूर येथे अप्पर तहसीलदार अ.कृ.आ.क्र.2, जि. नागपूर या अमित घाटगे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदली करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश आज दिनांक एक जुलैला मंत्रालय, मुंबई येथून निर्गमित झाले आहेत.
                    महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 4(4) व 4(5) मधील तरतुदीनुसार बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. कळमेश्वर तहसीलदार मकवाने यांच्या तडकाफडकी अकाली बदली ने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
                   सदर आदेशाची तात्काल अंमलबजावणी करण्याचेही आदेशात नमूद असून बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्यात कोणतीही हयगय केल्यास किंवा बदली झालेल्या ठिकाणी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद आहे. महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई शासन आदेश क्रं. बदली-2025/प्र.क्र.152/ई-3 नुसार अद्याप कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने यांच्या बदलीचे स्पष्ट कारण पुढे आलेले नाही, परंतु अकाली झालेली ही बदली नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News