State Transport Bus : ७५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नंदापुरात एसटी बस आली हो…

नंदापुरात एसटी बस आली हो… आपचे पंकज घाटोडे यांच्या प्रयत्नांना यश!

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट 

काटा वृत्तसेवा : भुषण सवाईकर
सावनेर/नागपूर: जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा शहरापासून उत्तरेस 3 किलोमीटरवर नंदापूर व करजघाट या गावांत प्रथमच एसटी बस दाखल झाली. नंदापुरात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनंतर दि. 1 जुलै ला सकाळी एसटी सेवा सुरू झाल्याने, ग्रामस्थांनी एकच् जल्लोश केला, विशेष करून विद्यार्थी, महिला व जेष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
                        खाप्यापासून अवघ्या ४ किलोमीटरवर असलेल्या या गावात कधीच एसटी सेवा मिळाली नाही. परिणामी ४० ते ५० विद्यार्थी भर उन्ह- पावसात सावनेर व खापा येथे शिक्षणासाठी नाइलाजाने ४/4 किमी पायी चालावे लागत होते. यात शेतकरी मजुरांच्या मुला-मुलींच्या नशीबी सायकलीही नसल्याने अनेकांना आपला शिक्षणाचा प्रवास अर्ध्यावरच् सोडावा लागला.
                        नंदापुरातील महिला मंडळाने आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आवाज उठवत आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोडे यांचेशी संपर्क साधून एसटी सेवा सुरू करण्याचे महत्व व गरज लक्षात आणून दिली. पंकज घाटोडे यांनी महिलांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर ही एसटी सेवा नियमीतपणे सुरू झाली आहे.
                       नागपूरचे वाहतुक अधिक्षक राकेश रामटेके, आगार व्यवस्थापक गुणवंत तागडे यांनी पंकज घाटोडे यांच्या मागणीवर तात्काळ कारवाई करत सावनेर-शेरडी-गडेगाव-नंदापुर-करजघाट-खापा या मार्गावर दोन वेळा बस सुरू केली. एसटी साठीच्या या लढयात नंदापुराचे सरपंच मनोज बनसोड, जामुवंत वारकरी, गजू चौधरी, योगेश राऊत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
                        या ऐतिहासिक एसटी सेवा शुभारंभ प्रसंगी विद्यार्थी, पालकवर्ग, महिला मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी पंकज घाटोडे यांनी नंदापुर व करजगावला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एसटी बस सेवेसाठी केलेल्या संघर्षशील सहकार्याबद्यल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News