आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर निःशुल्क रोग निदान व आरोग्य मार्गदर्शन शिबिर

‘‘जन सेवा हीच ईश्वर सेवा’’ : आ. मोहन मते

इटकेलवार हाॅस्पिटलचे रोग निदान व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे निःशुल्क आयोजन

का टा वृत्तसेवा : डाॅ. अरविंद हरणे
नागपूर : शहरातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक व इटकेलवार मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चे संचालक डाॅ. जयंत व्ही. इटकेलवार, त्यांचे सुपूत्र डाॅ. भूषण ज. इटकेलवार व स्नुषा डाॅ. माधवी भू. इटकेलवार (एम. एस. प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ) यांनी ६ जुलैला आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर, रोग निदान व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे निःशुल्क आयोजन केले होते. रेशीमबाग बगीच्यात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १९७ लाभार्थ्यांनी, निःशुल्क हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, HbA1c, थायराॅइड, ब्लड प्रेशर तपासणीचा लाभ घेतला तसेच व फिजिशियन आणि स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेतला.
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा/ www.kamgartimes.com
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा/ www.kamgartimes.com
या शुभप्रसंगी नवनिर्मित ‘इटकेलवार हेल्थ क्लिनिक’ चा शुभारंभ नागपूर दक्षिणचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते करण्यात आला. हे क्लिनिक डाॅ. जयंत व्ही. इटकेलवार यांच्या राहत्या घरी ‘‘विठाई’’ N-84, रेशीमबाग येथे स्थित असून, तेथे डाॅ. भूषण ज. इटकेलवार सकाळी ९-११ व डाॅ. सौ. माधवी भू. इटकेलवार सायंकाळी ६-८ उपलब्ध राहणार आहेत.

इटकेलवार मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चे आयोजन

                      आमदार मोहन मते यांनी शिबिरास भेट देऊन, शिबीरातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या आरोग्य संदर्भात माहिती जाणून घेतली. त्यांना नियमित आरोग्य तपासणी संदर्भात मार्गदर्शन केले. इटकेलवार मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या वतीने आयोजीत निःशुल्क शिबीराचे आयोजनाबद्धल त्यांनी डाॅ. जयंत इटकेलवार, डाॅ. माधवी व भूषण इटकेलवार यांच्या निःशुल्क शिबीराचे आयोजनाबद्धल प्रशंसा केली व ‘‘जन सेवा हीच ईश्वर सेवा’’ माणून सेवेचा संदेश दिल्याबद्धल इटकेलवार कुटुंबाच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा/ www.kamgartimes.com
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा/ www.kamgartimes.com
तसेच या शिबिरास डाॅ. अनंत व्ही. दासरवार, माजी डेप्यूटी डायरेक्टर हेल्थ सर्विस, संदीप व. इटकेलवार विश्वस्त, नागपूर सुधार प्रन्यास, अरविंद सावकार पोरेड्डीवार, अध्यक्ष, सर्वोदय शिक्षण मंडळ, माजी आमदार अशोक मानकर, डाॅ. अरविंद हरणे, उपाध्यक्ष वैद्यकीय सेवा समिती, अमर आकरे, अध्यक्ष, कलासंगम नागपूर, रवींद्र इटकेलवार, उपाध्यक्ष, नागपूर शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी व इतर मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
या शिबिरास कलासंगम नागपूर व तसेच कलासंगम च्या इतर पदाधिकार्यांनी विशेष सहयोग देऊन सहकार्य केले. तसेच Lions club of Nagpur, Medicos Rotary club of Nagpur व Green City  यांनी देखील शिबिरास सहयोग दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News