गुजरातेत पूल कोसळला, 9 जणांचा मृत्यू, 8 जणांना वाचवले

गुजरातेत पूल कोसळला, 9 जणांचा मृत्यू, 8 जणांना वाचवले 

वाहने नदीत पडली; मध्य गुजरातचा सौराष्ट्राशी संपर्क तुटला

वडोदरा : (1 तासापूर्वी ) गुजरातमधील वडोदरा येथील महिसागर नदीवरील पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघात झाला तेव्हा वाहने पूल ओलांडत होती. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी एकूण पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या टोकाला एक टँकर अडकला.

                        या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. अग्निशमन दलाच्या तीन पथकांना बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे. ४५ वर्षे जुना हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडत होता. पूल कोसळल्यामुळे दक्षिण गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी, तापी आणि वलसाड या शहरांमधून सौराष्ट्रला पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागेल. आता यासाठी अहमदाबादमार्गे लांब मार्गाने जावे लागेल.

पाड्रा येथे ६, तर वडोदरा रुग्णालयात २ जण दाखल

                         या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. ६ जणांना वडोदरा येथील पद्रा रुग्णालयात आणि २ जणांना सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली. त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. लोकांनी सांगितले की, ४५ वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळविण्यात आले आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने आज ही दुर्घटना घडली. या अपघाताला प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोक करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News