February 7, 2026 8:50 am

Orange growers are in crisis : मृग बहार फसल्याने संत्रा उत्पादक संकटात

तहसीलदार विकास बिक्कड यांना निवेदन देताना शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ.

संत्र्याच्या मृग बहाराची फूट न झाल्याने संत्रा उत्पादक संकटात

शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

का टा वृत्तसेवा I विजय नागपुरे
कळमेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख आर्थिक पीक असलेल्या संत्रा पिकावर यंदा संकट ओढवले असून, मे-जून २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या मृग बहाराची फूट न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे संत्रा उत्पादन पूर्णतः कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
                        या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विकास बिक्कड यांना निवेदन दिले आहे. नुकसानीचा तातडीने सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच सन २०२३-२४ मध्ये फळगळ झालेल्या संत्रा पिकाचे प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
संत्र्याच्या मृग बहाराची फूट न झाल्याने संत्रा उत्पादक संकटात
संत्र्याच्या मृग बहाराची फूट न झाल्याने संत्रा उत्पादक संकटात
                         संत्र्याच्या मृग बहारासाठी शेतकऱ्यांनी आधीच पूर्वमशागत, खत, औषध फवारणी यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र, अवकाळी पावसामुळे संपूर्ण श्रम आणि खर्च वाया गेला आहे. यामुळे शासनाने तातडीने सर्वे करूनन्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
                          तहसीलदारांना निवेदन देताना खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तथा प्रगतिशील शेतकरी बाबा कोढे, कृउबासचे सभापती बाबा पाटील, वैभव घोंगे, आशिष देशमुख, किशोर मोहोड, श्रावण भिंगारे, अशोक जीवतोडे, सुभाष किरपाल, अभय तिडके, नरेश गोतमारे, श्रीराम धोटे, निळकंठ भोसकर, अमोल फुलारे, धर्मराज आसोले, प्रभाकर रानडे, संगीता वासनिक, वीरेंद्रसिंह बैस, शंकर काळे, कैलास टोंगे, अतुल नागपुरे, मिलिंद राऊत, नरेश राऊत, गजानन भिंगारे, प्रीतम अंबडकर, नंदू फरकाडे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

 

 

0
0

Leave a Reply

Realted News