नागपूर : ‘शिक्षण हा व्यवसाय नसून व्रत आहे’, असे मत माजी आमदार अनिल सोले यांनी व्यक्त केल आहे. ते .श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘महाविद्यालय स्थापनादिन’ सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, मोहता विज्ञान महाविद्यालयाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असून, ते स्वतः या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष इंजि. मोहित शाह होते.
याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आर. रामकृष्णन यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरण रक्षणार्थ नवीन पिढीने प्रवृत्त व्हावे, असे विचार व्यक्त केले. तसेच नागपूर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष विकास बिंझाणी, सचिव ॲड. राजीव देव, प्राचार्य जीवन दोंतुलवार मंचावर विराजमान होते. यावेळी नागपूर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी महेश अग्रवाल, ॲड .राजेंद्र राठी, चंद्रशेखर चांडक, मथुरादास पणपालिया, मधुसूदन बिंझाणी, डॉ. विजया खानझोडे, डॉ.वाय .एस .देशपांडे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच विज्ञान संस्थेचे माजी प्राध्यापक डॉ. आय. एच .जिवाजी, तसेच नागपूर शिक्षण मंडळाच्या घटक संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. जीवन दोंतुलवार यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. मुख्य अतिथींचा परिचय डॉ. देवराम नंदनवार यांनी करून दिला. महाविद्यालयाच्या प्रगतीत सहकार्य करणार्या व उपक्रमशील प्राध्यापकांचा आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात डॉ. अर्चना सवाने, डॉ. वैशाली बडिये, डॉ. वैशाली रामगुंडे, संदिप तम्मेवार, प्रा. श्यामली खळतकर, डॉ. मधुकर धोंडे, डॉ .जगदीश जनबंधू, डॉ. सतीश राठोड, डॉ. संभाजी भोसले, डॉ. अमित सेटिया, डॉ. संजिवनी जवदंड, डॉ. अश्विनी दानव, डॉ. कपिल गणोरकर, डॉ. विजय सापनेर, प्रा. आदित्य तिवारी, प्रा. पायल दुधे, डॉ. सुमित चव्हाण, वंदना अंबाडे, सोनाली गांजे, दिनेश कोटांगले, संदेश तम्मेवार, रक्षा लिंगे, मानसी साधनकर, डॉ. मनिष कटिया तर शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये अविनाश खोलकुटे, ज्ञानेश्वर धारफोडे, शरद भोयर, सचिन दाभणेकर, दिव्या आंबुलकर वैशाली मडावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये संजना कोली, अनुष्का वाघमारे, वृष्टी उरकुडे, वैभव खानोरकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशाली रामगुंडे व प्रा. श्यामली खळतकर यांनी केले तर आभार दिनेश कोटांगले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. जितेंद्र रामटेके, कार्यक्रम समन्वयक डॉ. निखिल पाळंदे, डॉ. सतिश गोस्वामी, डॉ .विजय सोमण, डॉ. भावना सलामे, प्रा. भावना मडावी, डॉ पुनम गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले.