स्व. दादासाहेब बारोकर हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात
पालक सभा व विवीध कार्यक्रम उत्साहात
काटोल : आज सोमवारला स्व. दादासाहेब बारोकर हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येरला (धोटे) ता. काटोल येथे पालक सभा घेण्यात आली. यावेळी ‘एक पेड माॅं के नाम’ अंतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच ECO (क्लब) ची स्थापना करून ONLINE रजिस्ट्रेशन करून लिंक भरण्यात आली.
वरील कार्यक्रमाला पालक देवेंद्र थोटे, श्री. नासरे, सौ. वासाडे, आशा कातरे (पोलीस पाटील), डाॅ. बिसेन व पालकवृंद तसेच शाळेच्या प्राचार्या सी आर गिरोलकर शाळेचे संस्थापक पी. ए. श्रीराव, जेष्ठ शिक्षक डि. डि. वानखडे, प्राध्यापक पूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शाळेचे संस्थापक अध्यक्ष पी. ए. श्रीराव यांचा वाढदिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व पालक, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सरतेशेेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.