अल्पवयीन मुलाच्या लैंगिक संबंधातून मैत्रिणीला गर्भधारणा
पीडिता चार महिन्यांची गर्भवती : साहुली-खडगाव येथील घटना
काटा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर : १५ वर्षीय मुलाने त्याच्या १४ वर्षीय मैत्रिणीसोबत वारंवार लैंगिक संबध केल्याने तीला गर्भधारणा होउन ती चार महिन्याची गर्भवती झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. मुलीची काही महिन्यांपासून मासिक पाळी बंद असल्याचे लक्षात आल्याने आईने तिला नागपूर शहरातील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले असता तपासणीअंती ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती, डॉक्टरांनी तिच्या आईला दिली. तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला.
सदर प्रकरण कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील साहुली (खडगाव) येथे घडले असुन, चार महिन्यांची अल्पवयीन गर्भवतीच्या या प्रकरणात आईने मुलीसह पोलिस ठाणे गाठून घटनेस जबाबदार अल्पवयीन आरोपी विरूद्ध तक्रार नोंदविली.
याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ (२) (३), ६५ (१) मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही एकाच गावात राहत असून, ते नववीत शिकत आहेत. याप्रकरणी मुलाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (३), ६५ (१), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६ अन्वये कळमेश्वर पोलिसांनी बुधवारी (दि.२३) गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसात दाखल घटनेप्रमाणे दोघेही साहुली (खडगाव) येथील रहिवासी असून, ते शेजारीच राहात असल्याने त्यांची आपसात पुर्वीपासूनच ओळख आहे. दोघेही एकाच शाळेत इयत्ता नववीत शिकत असल्याने त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो तिला नेहमीच त्याच्या घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर भेटायला बोलावत होता. याच काळात त्याने तिच्याशी शरीरसंबंध (बळजबरीने) प्रस्थापित केले. मात्र, तिने याबाबत कुणाकडेही वाच्यता केली नाही. मासिक पाळी बंद असल्याचे आईच्या लक्षात आल्यावरून घटना उघडकीस आली. पोलीसांनी मुलीला उपचारासाठी मेयो रूग्णालयात भरती केले असून अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास ठाणेदार मनोज काळबांडे करीत आहेत.
![]()
![]()
![]()
![]()