श्रीगुरूदेव युवामंचच्या आव्हानाची नागपूर विद्यापीठाने घेतली दखल

राष्ट्रसंतांच्या अभ्यासक्रमातून सक्षम विद्यार्थी घडावेत : प्र-कुलगुरू कोंडावार

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने नागपूर विद्यापीठाला एक वेगळी प्रतीष्ठा प्रप्त झाली आहे. राष्ट्रसंतांच साहित्य आणि ग्रामगीता श्रमप्रतीष्ठेचे मार्गदर्शक तत्वे आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच ज्ञान ग्रामगीतेच्या विचारात सामावलेले आहे.
                     विद्यापीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर अभ्यासक्रम सुरू करून सर्वच क्षेत्रात सक्षम विद्यार्थी निर्माण होतील असा प्रयत्न केला आहे. या अभ्यासक्रमाला सक्षम करण्यासाठी विद्यापीठस्थरावर सर्व प्रयत्न केल्या जाईल, याचे आश्वासन श्रीगुरूदेव युवामंचा द्वारे गेलेल्या शिष्टमंडळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. सुभाष कोंडावार यांनी दीले.
                    चर्चेत बोलतांना राष्ट्रसंतांच्या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेसाठी केलेली फाईल मीळत नसेल, तर नवीन फाईल करण्यासाठीच्या कारवाईत लक्ष घालण्याचे आश्वासन देत, ग्रामगीता भवन हे राष्ट्रसंतांच्या अध्यासन आणि विचारधारेच्या कार्यासाठी, राष्ट्रसंतांच्या साहित्यावरील वाचनालय आणि संशोधन केंद्र निर्माण करण्यासाठीच उपयोगात आणन्याचा प्रयत्न राहील, यासाठी अश्वस्थ केले.

                    श्रीगुरूदेव युवामंचाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक यांच्या मार्गदर्शनात एका शिष्टमंडळाने प्र-कुलगुरुंची भेट घेऊन लेखी निवेदन देत त्यांच्याशी सवांद साधला. या चर्चेत श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे देवीदास लाखे, रामराव चोपड़े, डाॅ. गजानन काकड, बाळू शिंदे, लता लाखे, चंद्रभान राऊत, दिलीप घाडगे, मोहन चोरे, बाळकृष्ण भोंडे, सत्यवान मोरे, श्रीराम नखाते, निळकंठ कळंबे, जी. एस. इंगळे, सुधाकर आगोले, नवीन कळमकर, अमोल सोमुकवर सहभागी झाले होते.
: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
  प्रवर्तक श्रीगुरूदेव युवामंच
  9823966292

 

 

0
0

Leave a Reply

Realted News