तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक धडाक्यात संपन्न
डाॅ. पोतदारांची ‘भ्रष्टाचाराविरूद्ध फाईट,
सारे अधिकारी-कर्मचारी झाले टाइट’
काटा वृत्तसेवा I
कळमेश्वर : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली निहीत जबाबदारी व कर्तव्याचे भान ठेवून तक्रारदाराचे तात्काळ समाधान करण्यासोबतच पैसे खाण्याऱ्यांना ACB चे TRAP लावण्याची धमकीवजा सूचना डाॅ. पोतदार यांनी केली आहे. ते कळमेश्वर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या आयोजीत पहिल्या बैठकीत बोलत होते. डाॅ. पोतदार यांची कळमेश्वर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे.
कळमेश्वर तहसील कार्यालयात मंगळवारी (दि.29) समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डाॅ. पोतदार होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत आ. डाॅ. आशिष देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती, ईश्वर यावलकर, अजय वाटकर, धनराज देवके, दिलीप धोटे, मीना तायवाडे, संदीप उपाध्याय, बेबीताई धुर्वे, प्रतीक कोल्हे, महादेव इखार, प्रकाश वरुडकर, दिलीप तायवाडे, वैभव टेकाडे, मंगेश चौरे, स्वप्नील चौधरी, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार विकास बिक्कड, ठाणेदार मनोज काळबांडे, मिलिंद शिंदे, उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, नायब तहसीलदार ज्योती जाधव, संदीप तडसे तसेच पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, राज्य विद्यृत वितरण, एस टी महामंडळ इ. सह विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
