दिल्लीच्या तरुणाने तरुणीला इंस्टाग्रामद्वारे फसवले,
1 लाखांसाठी ब्लॅकमेल, नकार दिल्यावर व्हायरल केला ‘नग्न व्हिडिओ’
जशपूर : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात, दिल्लीतील एका तरुणाने एका मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपीने इन्स्टाग्रामवर पिडीता मुलीशी मैत्री केली, तिला आपल्या जाळ्यात अडकवले आणि नंतर व्हिडिओ कॉलद्वारे तीचा नग्न व्हिडिओ बनवला. हे प्रकरण कुंकूरी पोलिस स्टेशन परिसरातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव कंवलजीत सिंग (२५) असून तोे दिल्लीचा रहिवासी आहे. आरोपीने अश्लील व्हिडिओ डिलीट करण्याच्या बदल्यात पिडीता मुलीला १ लाख रुपये मागितले. तीने पैसे न दिल्याने त्याने मुलीचे फेसबुक हॅक केले आणि अश्लील व्हिडिओ अपलोड केला. पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे.
पीडितेने १८ जुलै २०२२ रोजी कुंकुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेने सांगितले होते की ती इन्स्टाग्रामवर कंवलजीत सिंग उर्फ गुरदित सिंग नावाच्या व्यक्तीला भेटली होती. संभाषणादरम्यान दोघांमध्ये व्हिडिओ कॉलिंग देखील झाले. दरम्यान, आरोपीने मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला. यानंतर, आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि मुलीकडून पैसे मागितले. त्याने मुलीचे फेसबुक अकाउंट हॅक केले आणि नंतर तिच्या फेसबुक स्टोरीवर एक अश्लील व्हिडिओ पोस्ट केला. यामुळे गावात आणि समाजात मुलीची खूप बदनामी झाली असल्याचे तीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदर प्रकरणात कुंकुरी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 309 (4) आणि आयटी कायद्याच्या कलम ६७, ६७ अ आणि ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, आरोपीच्या सोशल मीडिया आयडी आणि मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपासणीत तो दिल्लीतील गुरुनानक नगर पोलिस स्टेशन टिळक नगर परिसरात असल्याचे समोर आले.
