August 15, 2025 4:30 am

शिक्षकांना बीएलओ कामातून वगळा, शिक्षक संघटनेची मागणी

बीएलओचे कामाचा शैक्षणिक कामकाजावर दुष्परिणाम

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

का टा वृत्तसेवा I
कळमेश्वर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तालुक्यातील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने निवडणूक कळमेश्वर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. शासनाच्या वतीने नायब तहसिलदार आभा वाघमारे यांनी निवेदन स्विकारले.
                         तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांकडे गेली अनेक वर्षे बीएलओचे काम असल्याने त्याचा शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार जनगणना व प्रत्यक्ष निवडणूक कामकाज वगळता इतर कोणतेही अशैक्षणिक काम लावण्यात येऊ नयेत असे निर्देश आहेत. बीएलओ काम सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने हे कामकाज अन्य यंत्रणेकडे देऊन शिक्षकांना या कामामधून मुक्तकरावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
                         निवेदन देताना शिक्षक संघटनेचे नरेंद्र सहस्त्रबुद्धे, संजय आवारी, प्रकाश बांबल, अनिल पन्नासे, स्वप्निल रोकडे, श्रीकांत साबळकर, प्रशांत महाजन, सचिन भक्ते, राजेश पराते, प्रवीण निमकर, रूपाली फरकाडे, विनोद माहुरे, ममता माहुरे, विजय निंबाळकर, लक्ष्मण श्रीराव, राजेंद्र टेंभेकर, कल्पना बडवाईक, राजकुमार निखाडे, प्रमोद गहुकर, सुनीता घोरसे, ज्ञानेश्वर खाटके आदी शिक्षक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News