August 15, 2025 8:02 am

फडणवीस मराठा नेते अन् अधिकाऱ्यांना संपवताहेत : मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मला 30-32 आमदार-खासदारांचे फोन आल्याचा दावा : जरांगे

अहिल्यानगर : देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागले आहेत. आमचा काही लॉस नाही, पण सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी सावध होणं गरजेचे आहे. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे, मुद्दाम मराठा अधिकारी संपवण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्या नगरमध्ये बोलताना केला आहे.
                        मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सगळ्या मंत्र्यांना त्यांनी स्वत:चे एक-एक ओएस डी दिले आहेत. प्रत्येक खात्यामध्ये काय काम सुरू आहे त्यांची माहिती घेतली जात आहे. इतकं बेभरवश्याचे माणूस असतो का? ते तुमच्या पक्षात आले आहेत ना? तरी ओएसडी ठेवला आहे, यावरुन फडणवीस किती आतल्या गाठीचे आहे हे कळते.
                         मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भाजप वेगळा पक्ष होता आणि आता यांनी वेगळाच करुन ठेवला आहे.सत्तेवर येण्यासाठी भाजपमध्ये कधीच येऊ न शकणाऱ्या नेत्यांना त्यांनी भाजपसोबत आणले. नारायण राणे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे लोक तिकडे जाऊ शकत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तिकडे नेले. अशोक चव्हाण सारखा मुख्यमंत्री राहिलेला माणूस तिकडे जाऊ शकत नाही, पण यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला लावला.
                         काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या नेत्यांनी काय केंद्रीय गृहमंत्री पाहिले नाही का? पाहिले ना शिवराज सिंह पाटील पाहिले, सुशीलकुमार शिंदे पाहिले. पण आता त्यांना भाजपमध्ये जावे लागलं ही दशा आहे, मराठ्यांची. मीडियासमोर ते काही बोलणार नाही, पण सर्वांना माहिती आहे की हा माणूस सर्वांना संपवतो आहे.

फडणवीस यांनी भाजपमधील सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे यांची खूप फजिती केली : जरांगे

                        मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील लोकांनाही संपवले. सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे यांची खूप फजिती केली आहे. नितीन गडकरी यांची इतकी फजिती केली की त्यांनी दिल्ली न सोडण्याचा निर्णय घेतला.फडणवीस सत्तेसाठी त्यांच्याच लोकांना लाथाडतात. पक्षातील लोक त्यांना त्रासले आहे. भाजपचे काही जण मला फोन करतात आणि सांगतात बिले अडकले आहेत म्हणून बैठकीला येता येत नाही पण आम्ही मुंबईच्या मोर्चात नक्की सोबत राहू.

ओबीसी पालकमंत्री मराठा आमदारांना त्रास देतात

                         मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसीचे जिथे मंत्री केले आहेत ते भाजपच्याच मराठा आमदारांना त्रास देत आहे, अशी परिस्थिती जालन्यात दिसून येत आहे. अशाने कसा पक्ष वाढणार, पक्षातील लोक नाराज होत आहेत. ओबीसी मंत्री झाले तिथे मराठा आमदारांना त्रास देत आहेत. आमचे मराठा पालकमंत्री कुणाला त्रास देतात का? मला सत्ताधारी 30 ते 32 आमदार-खासदारांचे फोन आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News