February 7, 2026 4:03 pm

अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटली

कुटुंबीयांनी कळमेश्वर पो. स्टे. ला बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती

कळमेश्वर : दिनांक १७.०८.२०२५ रोजी कळमेश्वर औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ सुमारे २०० मीटर अंतरावर ब्राम्हणी, वॉर्ड क्रमांक ५, कळमेश्वर येथील रहिवासी राकेश ध्रुव करमरकर (वय ५३) यांचा मृतदेह आढळून आला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी याची माहिती कळमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. चेहऱ्यावर मार लागल्यामुळे आणि ओळख पटवता न आल्यामुळे प्रारंभी अज्ञात मृत व्यक्ती म्हणून घटनेची नोंद घेण्यात आली होती.
                       दरम्यान, राकेश ध्रुव करमरकर हे १७ तारखेला रात्रीपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कळमेश्वर पोलिसांनी राकेश यांच्या कुटुंबीयांनी राकेश यांच्या मृतदेहाची ओळख पटवली.
                       मृत राकेश हे गुरुनानक इंजिनिअरिंग कॉलेज, दहेगाव, कळमेश्वर येथे कार्यरत होते. मात्र, मागील ६ ते ७ महिन्यांपासून त्यांना मासिक वेतन मिळाले नव्हते, त्यामुळे ते आर्थिक तणावाखाली होते, अशी चर्चा सध्या होत आहे. राकेश हे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले आहे.

 

0
0

Leave a Reply

Realted News