अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दोन हजार रुपये ‘भाऊबीज भेट’

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतली.महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यभरातील लाखो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही भाऊबीज भेट रक्कम त्वरित अदा करण्यासाठी राज्य शासनाने ४० कोटी ६१ लाख ३० हजार इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे वितरण आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई’यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे. शासनाने आयुक्तांना तातडीने या रकमेचे वितरण करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यामध्ये कार्यरत आहेत ५५३ बालविकास प्रकल्प
राज्यामध्ये ५५३ बालविकास प्रकल्प कार्यरत असून त्यामध्ये ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात ४४९ प्रकल्प आणि नागरी क्षेत्रात १०४ प्रकल्प कार्यरत आहेत. केंद्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्यासाठी १,१०,५५६ मंजूर अंगणवाडी केंद्रे असून त्यापैकी ग्रामीण क्षेत्रात ७३,११६ अंगणवाडी केंद्रे व आणि आदिवासी क्षेत्रात १७,५७१ अंगणवाडी केंद्रे तसेच नागरी क्षेत्रात १९,७९९ अंगणवाडी केंद्रे व पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत ७० अंगणवाडी केंद्रे आदिवासी भागात मंजूर आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस विविध कामे करतात. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात शासनाने जाहीर केलेली ही भेट त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे.











Users Today : 3
Users Yesterday : 11