February 7, 2026 10:16 am

देह व्यापार अड्ड्यावर पोलिसांची संयुक्त धाड

मुख्य आरोपी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा : स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांनी संयुक्तरीत्या केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत, शहरातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या एका देह व्यापार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई दिनांक ०१/१०/२०२५ रोजी करण्यात आली.
                        गुप्त माहितीच्या आधारे भंडारा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका दुमजली राहत्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान, संगीता धारगावे (वय ४५ वर्ष) ही मुख्य आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले. तिच्यासोबत अन्य दोन आरोपीही यात सामील असल्याचे आढळून आले आहे.
                      पोलिसांनी घटनास्थळावरून १,०००/- रुपये रोख रक्कम आणि २०,०२०/- रुपये किमतीचे दोन मोबाईल (विवो आणि ओप्पो) असा एकूण २१,०२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
                      या गंभीर प्रकरणी, आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन भंडारा येथे अप. क्र. १३४६/२०२५ अन्वये कलम ३, ४, ५ (१) स्त्री अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा (The Immoral Traffic Prevention Act, १९५६) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
                       ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक नूरुल हसन, मा. अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि पो. नि. चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली म पो हवा. कुथे, घरडे, अ.मा.वा.प्र. कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.
0
0

Leave a Reply

Realted News