भाजपला ₹959 कोटी, काँग्रेसला ₹313 कोटी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये भाजपला इलेक्टोरल ट्रस्टमार्फत ₹959 कोटी, तर काँग्रेसला ₹313 कोटी देणग्या मिळाल्या.
टाटा समूहाच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टने 10 पक्षांना ₹914 कोटी दिले, त्यापैकी ₹757 कोटी भाजपच्या खात्यात गेले. काँग्रेसला ₹77.3 कोटी, तर इतर पक्षांना प्रत्येकी ₹10 कोटी मिळाले.
इलेक्टोरल बॉण्ड बंद झाल्यानंतर इलेक्टोरल ट्रस्ट हेच निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन ठरले आहे. ट्रस्टमार्फत मिळालेल्या निधीत भाजप अव्वल, त्यानंतर काँग्रेस, तृणमूल आणि इतर राष्ट्रीय पक्षांचा क्रम लागतो.
![]()