February 7, 2026 2:36 pm

विदर्भात डिसेंबरमध्ये थंडीचा कहर

विदर्भात डिसेंबरमध्ये थंडीचा कहर : अनेक शहरांत पाऱ्याची घट
ब्रम्हपुरीत 1992 मधील 2.6°C ची नोंद अजूनही विक्रमी

नागपूर : विदर्भात डिसेंबर महिन्यासोबतच कडाक्याची थंडी बळावली आहे. उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनेक शहरांत पारा खाली घसरत असून, नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार पुन्हा वाढवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंडीचा हा जोर काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

ब्रम्हपुरीतील विक्रमी थंडी
विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे 25 डिसेंबर 1992 रोजी 2.6°C अशी झाली होती. तसेच 28 डिसेंबर 1990 रोजी 2.8°C आणि 26 डिसेंबर 1992 रोजी 3.2°C इतका पारा खाली घसरला होता. हे आकडे डिसेंबरमधील थंडीची तीव्रता स्पष्ट करतात.

विदर्भातील विविध जिल्ह्यांतील किमान तापमान – ऐतिहासिक नोंदी

  • अकोला: 8 डिसेंबर 1883 रोजी 3.9°C, 30 डिसेंबर 2018 रोजी 5.9°C, 28 डिसेंबर 1968 रोजी 6.1°C

  • अमरावती: 21 डिसेंबर 2021 रोजी 7.7°C, 28 डिसेंबर 2005 रोजी 7.8°C, 19 डिसेंबर 2013 रोजी 8.2°C

  • बुलडाणा: 28 डिसेंबर 1983 रोजी 5.9°C, 27 डिसेंबर 1991 रोजी 6.2°C, 30 डिसेंबर 2018 रोजी 7.4°C

  • चंद्रपूर: 11 डिसेंबर 2000 रोजी 3.5°C, 29 डिसेंबर 2019 रोजी 5.1°C, 28 डिसेंबर 2019 रोजी 5.4°C

  • गोंदिया: 28 डिसेंबर 2000 रोजी 5.0°C, 28 डिसेंबर 2019 रोजी 5.2°C, 30 डिसेंबर 2019 रोजी 5.8°C

साधारणपणे विदर्भात डिसेंबरमध्ये किमान तापमान 5°C च्या आसपास राहते.

नागपूर व परिसरातील थंडीची नोंद

  • नागपूर: 29 डिसेंबर 2018 रोजी 3.5°C, 30 डिसेंबर 2018 रोजी 4.0°C, 29 डिसेंबर 2019 रोजी 5.0°C

  • वर्धा: 22 डिसेंबर 2010 रोजी 4.3°C, 20 डिसेंबर 2010 रोजी 4.5°C, 21 डिसेंबर 2010 रोजी 4.7°C

  • वाशिम: 22 डिसेंबर 2010 रोजी 8.8°C, 23 डिसेंबर 2010 रोजी 9.0°C, 16 डिसेंबर 2010 रोजी 9.6°C

  • यवतमाळ: 19 डिसेंबर 2010 रोजी 6.2°C, 21 डिसेंबर 2010 रोजी 6.4°C, 18 डिसेंबर 2010 रोजी 6.6°C

हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे या आठवड्यातही थंडीचा जोर कायम राहणार आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

0
0

Leave a Reply

Realted News