February 7, 2026 11:20 am

AIDS : मोहपा येथे एड्सविषयी प्रभावी सामाजिक संदेश..

बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला भरभरून दाद

का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर

मोहपा : बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रा. शैलेश हातबुडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका थोडगे होत्या. विद्यार्थ्यांच्या चित्रांतील सामाजिक संदेशांचे कौतुक करत त्या म्हणाल्या की, “एड्सविषयी योग्य माहिती व जागरूकता समाजापर्यंत नेण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज आहे.”

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित

या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रमोद वडते आणि डॉ. धनंजय देवते होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही–एड्सबाबतचे वैज्ञानिक तथ्य, प्रतिबंधाचे उपाय आणि समाजातील गैरसमज दूर करण्याची गरज स्पष्ट केली. तरुणांनी पुढे येऊन सकारात्मक संदेश पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्जनशीलतेतून दिला प्रभावी सामाजिक संदेश

विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
एड्सविषयी

  • जनजागृती

  • प्रतिबंध

  • उपचाराबाबतची माहिती

  • सामाजिक स्वीकार

  • आणि आशावादी जीवनदृष्टी

या विषयांवर विद्यार्थीांनी तयार केलेल्या पोस्टरमध्ये प्रभावी संदेश उमटले.

स्पर्धेतील विजेते :

  • प्रथम : कु. तनुजा मेटे

  • द्वितीय : आदित्य पेंदाम

प्रोत्साहनपर बक्षीस : काजल कळंबे, अनुजा टेकाडे, सुचिता निमकर, साहिल म्हैसकर, कुणाल धुर्वे, आलोक सेन आणि करण सिंग.

परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले आणि या कलाकृती “प्रबोधनात्मक व प्रभावी” असल्याचे म्हटले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिता गणोरकर, प्रस्तावना प्रा. शैलेश हातबुडे तर आभार प्रदर्शन प्रा. पवन उमक यांनी केले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मिळून कार्यक्रम यशस्वी केला.

जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कला आणि माहितीच्या माध्यमातून दिलेला सकारात्मक आरोग्य संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

0
0

Leave a Reply

Realted News