February 7, 2026 8:37 am

श्वेतल लोणारे यांना विदर्भस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार

श्वेतल लोणारे यांना विदर्भस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार

कळमेश्वर : महावितरणच्या मानव संसाधन विभागात कार्यरत आणि मोहपा येथील रहिवासी श्वेतल लिलाधर लोणारे यांना महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर यांच्या तर्फे ‘विदर्भस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार २०२५’ घोषित करण्यात आला. महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आयोजित गुणगौरव समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजकार्याची उल्लेखनीय कामगिरी

श्वेतल लोणारे हे ‘क्रांतिसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’ संस्थेचे सहसचिव तसेच माळी महासंघ युवा आघाडीचे माजी उपाध्यक्ष असून पूर्व विदर्भ प्रदेश पद त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या स्टडी सर्कलमार्फत मागील १३ वर्षांपासून विनामूल्य स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालय चालवले जाते.
मागील वर्षी संस्थेतील ३८ विद्यार्थी विविध शासकीय विभागात निवड झाले ही मोठी कामगिरी आहे.

सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार

  • दिवाळीत फटाक्यांवरील खर्च वाचवून मातोश्री वृद्धाश्रम, आदासा आणि स्वामी विवेकानंद वृद्धाश्रम, सावनेर येथे ‘फटाके व प्रदूषणमुक्त दिवाळी’ उपक्रम

  • पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा–झाडे जगवा उपक्रम

  • विविध सामाजिक आणि जनजागृतीच्या कार्यक्रमांचे नियमित आयोजन

सन्मान आणि शुभेच्छा

महात्मा फुले शिक्षण संस्थेने त्यांच्या या उपक्रमांची दखल घेऊन शाल, मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित केले.

या निवडीबद्दल क्रांतिसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत महाजन, उपाध्यक्ष गणेश बोबडे, सचिव इंजि. आशिष रेवतकर, कोषाध्यक्ष इंजि. शैलेश बनसोड, कार्यकारी संचालक राहुल श्रीखंडे तसेच मोहपा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व प्राचार्य समसुद्दीन शेख, डॉ. मंदार कऊटकर, नवीन गंभीरवार, नागराज वानखेडे, रुस्तम शेख, गिरीधर पल्हाडे, अरविंद पल्हाडे, श्याम खरबडे आदींनी लोणारे यांचे अभिनंदन केले.

0
0

Leave a Reply

Realted News