‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ या विषयावर विशेष मार्गदर्शन

सरस्वती महिला महाविद्यालय, सावनेर येथे ‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

सावनेर : येथील सरस्वती महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या करिअर घडणीच्या उद्देशाने ‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथील राज्यशास्त्राचे प्राध्यापक तसेच मुरारी करिअर अकॅडमी, नागपूरचे संचालक प्रा. शैलेश हातबुडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना प्रा. हातबुडे यांनी विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची योग्य दिशा, नियोजन, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन तसेच बदलत्या स्पर्धात्मक वातावरणातील आव्हाने याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. राकेश लोहकरे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात अशा मार्गदर्शनपर उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांची योग्य माहिती मिळून त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास प्रा. नीता इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सुजाता निकाजू यांनी केले, तर प्रा. प्रतिभा वडस्कर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मनिषा पेटकर, प्रा. प्रणिता घोरसे, प्रा. अंकिता मतेल, प्रा. राहुल बनसोड तसेच महाविद्यालयातील कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले.

या मार्गदर्शन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या व त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

0
0

Leave a Reply

Realted News