आर्वी विधानसभा युवा मोर्चा प्रमुख पदी रोशन चौधरी यांची निवड
कारंजा घाडगे : कारंजा घाडगे तालुक्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष, अत्यंत शांत व सु स्वभावी म्हणून परिचित असलेले रोशन महादेवराव चौधरी यांची भाजपा आर्वी विधानसभा प्रमुख पदी निवड झाली आहे.
निवडीबद्दल त्यांनी आमदार श्री सुमित वानखडे, जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ सरिता विजयराव गाखरे, हरिभाऊ धोटे, मुकुंदराव बारंगे, विजय गाखरे, किशोर भांगे यांच्यासह कारंजा तालुका भाजपा कार्यकारिणी चे आभार मानले असून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.