♦ शाहरुख, कोहली व रिंकूने सोबत डान्स केला,
♦ दिशाने मलंगवर परफॉर्म केले; करणने तौबा-तौबा गायले
कोलकाता : आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात धमाकेदार झाली. शनिवारी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये झालेल्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड स्टार शाहरुख खान, विराट कोहली आणि रिंकू सिंग यांनी एकत्र नृत्य केले. कोहलीने झुमे जो पठाणवर नृत्य केले आणि रिंकू सिंगने शाहरुखसोबत ‘मैं लुट गया…’ या गाण्यावर नृत्य केले.
