February 7, 2026 8:38 am

KARANJA (GHA) : हनुमान मंदिरात नववर्षानिमित्त धार्मिक उत्सव

हनुमान मंदिरात नववर्षानिमित्त धार्मिक उत्सव

कारंजा (घा). :  नववार्षानिमित्त संकटमोचक हनुमानजी ला वंदन करून आपल्या वर्षभराच्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करण्याची येथील नागरिकांची परंपरा आहे. नववर्षातील येणाऱ्या पहिल्या शनिवारी गावाच्या वेशीवर असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात लोकसहभागातून धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो.

यावेळी शहरातील व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या या शहरात दरवर्षी खर्डीपुरा येथील गावाबाहेरील हनुमान मंदिरात नववर्षानिमित्त धार्मिक कार्यक्रम व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 2 शुक्रवार ला रात्री श्री. गुरुदेव संस्कृती भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. 3 शनिवार ला पहाटे श्री. हनुमानजीच्या मूर्तीला अभिषेक व हवन त्यानंतर काल्याचे कीर्तन तसेच लटारे महाराज बँड पार्टी यांची रामधून व संगीतमय सुंदरकांड पाठ व सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News