February 7, 2026 7:18 am

LPG एलपीजी टँकर थांबवून खुलेआम गॅसची चोरी

गॅस सिलिंडर रिफिलिंग : गॅसची चोरी करणारे सेंटर वाळूजजवळ

अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कुणाचा?

हमे कुछ नही पता…!

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर : घरगुती वापराचा ‘एलपीजी’ वाहून नेणाऱ्या महाकाय टँकरमधून अवैधरीत्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (१० ऑक्टोबर) उघडकीस आला. वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या गंगापूर परिसरात हा प्रकार सुरू होता. आमदार प्रशांत बंब आणि काही स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ याबाबत भारत पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (पीईएसओ) यांना तातडीने पत्र पाठवले असून कारवाईची मागणी केली आहे. या टँकरचा परवाना रद्द झाला आहे. मात्र, हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवते याचा शोध सुरू असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे बंब यांनी सांगितले.
                           हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून (केए ०१ एएच ०८२८) थेट एलपीजी सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय सुरू होते. त्याचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. घटनास्थळी शेकडो गॅस सिलिंडरचे गोदाम असून तेथे सुरक्षेची कुठलीही उपाययोजना नव्हती. काही मोठी दुर्घटना घडून अनेकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. ‘पीईएसओ’कडूनदेखील या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली. स्टॅटिक्स अँड मोबाइल प्रेशर व्हेसल नियम २०२६ आणि गॅस सिलिंडर नियम २०१६ यांचे उल्लंघन केल्यामुळे टँकरचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

पाठपुरावा करून हा प्रकार बंद पाडणार!

                          कंपनीतून जेव्हा हे गॅस कंटेनर निघते तेव्हा त्यांच्यावर जीपीएसच्या मदतीने लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. औद्योगिक परिसरात अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने गॅस भरणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे आहे. यातून प्रशासन, पोलिस यंत्रणेचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मी पाठपुरावा करून अवैध सेंटर बंद पाडणार आहे. – प्रशांत बंब, आमदार, गंगापूर

तक्रारीनंतर ‘पीईएसओ’कडून टँकरचा परवाना निलंबित, चौकशीचे आदेश

                        वाळूजजवळ एचपी कंपनीच्या टँकरमधून गॅस रिफिलिंग करण्याचा प्रकार सुरू होता. शेजारच्या शेडमध्ये शेकडो सिलिंडर ठेवलेले आढळले.

जालना रोडवर टँकर लिकेज झाले होते

                         जालना रोडवर अशा प्रकारचे टँकर लिकेज झाले होते तेव्हा अर्ध्या शहराला धोका होता. मनपाचे अग्निशमन विभागाचे जवान. मनपा आयुक्त जी. श्रीकांत तत्कालीन पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी तत्काळ उपाययोजना करीत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या ठिकाणी लाखो लिटर गॅसचा साठा असलेले कंटेनर थांबवून त्यातून गॅस चोरी होत असल्याचा प्राथमिक प्रकार समोर आला आहे.

0
0

Leave a Reply

Realted News