PLATATION : ११,१११ झाडांचा वृक्षारोपण सोहळा

का टा वृत्तसेवा
कळमेश्वर :  तालुका वकील संघ, तालुका विधी सेवा समिती व वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने 11111 वृक्षांचे भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज सकाळी तेलकामठी येथे ९.३० ते ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. दिनेश पी. सुराणा असून मुख्य अतिथी मा. प्रविन एम. उन्हाळे, न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा समिती, नागपूर हे आहेत.
                        विशेष अतिथींमध्ये मा. संजीव सरदार न्यायाधीश दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर, सावनेर, नितिनजी तेलगोटे जिल्हा सरकारी अभियोक्ता नागपूर, सरिता ताराम, सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता, नागपूर हे उपस्थित राहतील.
                        डाॅ. विनीता व्यास, उप वन संरक्षक, नागपूर विभाग, एसडीओ संपत खलाटे, एसडीपीओ अनिल म्हस्के, कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड, कळमेश्वर पं. स. बीडीओ अंशुजा गराटे, कळमेश्वर पो. नि. मनोज काळबांडे, सावनेर पो. नि. उमेश पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, काटोल पांडुरंग पाखले, शैलेश जैन अध्यक्ष तालुका वकील संघ, सावनेर हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
                        या नाविण्यपूर्ण 11,111 वृक्षांच्या रोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक कळमेश्वर तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष तथा न्यायाधीश मा. रविंद्र ल. राठोड, मा. सौरभ बी. मांडवे सहन्यायाधिश, ॲड. हेमंत ताजने, अध्यक्ष तालुका वकील संघ, कळमेश्वर, ॲड. प्रल्लवी सोणवाने सरकारी अभियोक्ता, कळमेश्वर, ॲड. निलेश ज्ञा. अंजनकर, सचिव, तालुका वकिल संघ, कळमेश्वर तथा समस्त वकिल संघ यांनी केले आहे.
                        तर कार्यक्रमाचे आयोजनात ॲड. आकाश रा. काळे वि. सरकारी अभियोक्ता, कळमेश्वर,  प्रविण शिरपुरकर, कळमेश्वर क्षेत्र वन अधिकारी, ॲड. विद्या शेवाळे उपाध्यक्ष ता. व. सं. कळमेश्वर, ॲड. निलेश गजभिये तसेच प्रेमाताई डफरे, सरपंच ग्रा.पं. तेलकामठी यांचा सक्रीय सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News