February 7, 2026 2:42 pm

Rain Water : रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याने सावनेरच्या आंबेडकर संकुलातील दुकानदार त्रस्त!

सावनेर संकुलातील दुकानदारांचा न. प. प्रशासनाविरूद्ध आक्रमक, संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात!

का टा वृत्तसेवा : भुषन सवाईकर 
सावनेर: बस स्थानकाजवळ नगर परिषद आंबेडकर संकुलातील गाळेधारक दुकानदारांना, ऐन दुकानासमोर रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. दुकानासमोर दोन वर्षापुर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्याची मोठाले खडडे पडून पुर्णतः दुर्दशा झाली आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यातून भरधाव जाणारी सर्वच लहानमोठी वाहने घाणेरडे पावसाचे पाणी दुकानात उडवत जात असल्याने दुकानातला माल खराब होउन दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. दुकानदारांनी अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

                         दुकानांची जमिनीपासूनची उंची विचारात न घेता, सिमेंट रस्त्याचे बांधकाम केल्याने पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरण्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय असून, पावसाळयाच्या दिवसात साचलेल्या पाण्यामुळे ग्राहकांचे येणे-जाणेही कठीण झाले आहे. पावसाळयापुर्वी करावयाच्या नाल्यांची सफाई नाही, की रस्त्यांची डागडुजी नाही. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नगर परिषदे विरूद्ध मोठा असंतोष निर्माण झाला आहे. संतप्त दुकानदार तसेच नागरिकांनी, प्रस्तुत प्रतिनिधीजवळ आपल्या व्यथा सांगितल्या.

यावेळी दुकानदार व नागरिकांच्या रोषावरून परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात येते. परंतू नगर परिषदेचे ढिम्म प्रशासनाने निष्क्रियतेचे सारे रेकाॅर्ड मोडून काढले आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने समस्याग्रस्त जागेची पाहणी केली असता सामाजिक कार्यकर्ते व तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ढोबळे, संजय टेम्भेकर, जिल्हा सह-संघटनमंत्री संजय राऊत, तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर वाघमारे, छत्रपती लांबट, शहर अध्यक्ष गजुभाऊ चौधरी व अन्य आंबेडकर संकुलातील दुकानदारांनी समस्येचं गांभिर्य लक्षात आणून दिलं.
                          आम आदमी पार्टीचे जिल्हा महासचिव जामुवंत वारकरी यांनीही आपले स्तरावर समस्येला वाचा फोडण्याचे आश्वासन दिले आहे. सावनेर शहरातील नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनआंदोलनाचा इशाराही दिला आहे.

0
0

Leave a Reply

Realted News