जीवनात प्रत्येकाने दातृत्वभाव जपून, समाजासाठी अविरत कार्य करावे : इंजि. रत्नाकर चिमोटे
मोहपा : क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल, मोहपा येथे रोटरी समूह दक्षिण-पूर्व नागपूर यांचे वतीने मोहपा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सायकल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी समूहाचे माजी अध्यक्ष इंजि. रत्नाकर चिमोटे, तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी समूह अध्यक्ष विजय बाजारे यांच्या पत्नी फस्ट लेडी रोटरियन ज्योत्सना बाजारे, कल्पना चिमोटे, अमोल डहाट ग्रामपंचायत सदस्य म्हसेपठार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. प्रशांत महाजन यांनी केले. जीवनात प्रत्येकाने दातृत्वभाव जपून समाजासाठी अविरत कार्य करावे हा मनोदय इंजि रत्नाकर चिमोटे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. याप्रसंगी चार गरजू विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले. तन्मय संजय गहूकर, आरक्षा मुकेश खोब्रागडे पीएमश्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, क्रिश रामचंद्र सयाम, न्यू इंग्लिश हायस्कूल, राहूल राजू श्रीखंडे क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल या चार विद्यार्थांचा समावेश आहे.
कार्यक्रम संचालन शिक्षक प्रदीप विघ्ने यांनी केले. तर आभारप्रदर्शन श्वेतल लोन्हारी याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक चंद्रकांत गहूकर, राहून श्रीखंडे, कुणाल सहारे, प्रवीण राऊळकर, मयूर पवार, साहिल डहाट, पूनम रेवस्कर,अंकित सहारे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालक व क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कलचे विद्यार्थी उपस्थित होते.