”शालार्थ आयडी महाघोटाळ्यातील कोणताही आरोपी सुटता कामा नये”
शिक्षण विभागातील लाचखोरीचा पर्दाफाश, SIT च्या सखोल चौकशीची विदर्भ शिक्षक संघाची मागणी
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
नागपूर : विदर्भ शिक्षक संघाने शिक्षण विभागात चाललेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत, उच्च माध्यमिक विभागातील (ज्युनियर कॉलेज) शाळांत झालेल्या आयडी घोटाळ्याची चौकशी SIT मार्फत करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात, विदर्भ शिक्षक संघाने राज्याभरातील SIT आणि एसआयटीच्या स्थापनेची मागणी केली आहे.

विदर्भ शिक्षक संघाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या राज्यात मान्यता आणि आयडी घोटाळ्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहे. विशेषतः प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागांमध्ये हे प्रकार वाढले आहेत. शिक्षक भरती आणि इतर कामांमध्ये लाचखोरी आणि गैरव्यवहार होत असल्याचा आरोप विदर्भ शिक्षक संघाने केला आहे.
सन २०१२ पासून उत्तर माध्यमिक विभागात (बारावीमध्ये) देण्यात आलेल्या मान्यता आणि शाळांना देण्यात आलेल्या आयडीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
या प्रकरणी, विदर्भ शिक्षक संघाने मा. एस. आय. टी. प्रमुख श्री नित्यानंद झा झोन क्र. 2 कार्यालयाला निवेदन दिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, यावर शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी प्रांतीय अध्यक्ष महेंद्र कुमार धावडे, ग्रामीण सचिव मनिष निंबाळकर, जिल्हा सरकार्यवाह रामचंद्र घरजाळे, कार्याध्यक्ष गौस सर, कार्यवाह सगीर अहमद उवस्थित होते.


















Users Today : 0
Users Yesterday : 11