खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितल्यास पैसा व प्रसिद्धी : डॉ. जांगितवार
का टा वृत्तसेवा Iसंजय गणोरकर
कळमेश्वर : मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेळ : व्यावसायिक संधी व आरोग्य’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नागपूरच्या सी एस एम कॉलेजचे क्रीडा निदेशक डॉ. नितीन जंगीतवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका थोडगे होत्या.
खेळामुळे आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. तसेच अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितल्यास पैसा, प्रसिद्धी या गोष्टी मिळतात. फक्त त्यासाठी कठोर मेहनतीचीआवश्यकता आहे. असे विचार डॉ. नितीन जंगीतवार यांनी मांडले.
प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांनी आपल्या मनोगतातून खेळ हा मनुष्य जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणून विद्यार्थ्यांनी त्याकडे बघायला हवे. खेळामुळे आरोग्य हे तंदुरुस्त राखण्यास मदत होते. असे विचार मांडले. प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद भालेराव यांनी केले. संचालन प्रा. डॉ. लीलाधर खरपूरिये यांनी केले तर आभार प्रा. पवन उमक यांनी मानले.
कार्यक्रमाला ग्रंथपाल डॉ. धनंजय देवते, प्रा. डॉ. संजय ठवळे, प्रा. अनिता गणोरकर, प्रा. सचिन काळे, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. शुभम वाघ यांचेसह कल्पना देवळे व विद्यार्थी उपस्थित होते. अजय अंजनकर, रजनी गणोरकर, प्रदीप बगडे, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे यांनी सहकार्य केले.