मोहप्यात गॅसटंचाईमुळे नागरिकांचा संताप
मोहप्यात गॅसटंचाईमुळे नागरिकांचा संताप पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सिलिंडर वाटप काटा वृत्तसेवा : भूषण सवाईकर मोहपा : घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी मोहप्यातील गॅस वितरण केंद्रावर धडक देत संताप व्यक्त केला. सकाळी सुमारे १० वाजता ९० सिलिंडर घेऊन आलेल्या वाहनानंतर वितरण केंद्राबाहेर गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे ग्राहकांना सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल सहा तास प्रतीक्षा…