मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली
ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत – लाडक्या बहिणींना मोठा दिलासा
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी सुरू असलेली ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आधी निश्चित केलेली १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.










