लोकप्रतिनिधींकडून एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्रे
का टा वृत्तसेवा I संदिप माळोदे
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) निवड करण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील एकूण ४०० उमेदवारांना काल शनिवारी एकाच दिवशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संत ज्ञानेश्वर सभागृहात हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड व प्रवीण तायडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, वनसंरक्षक अर्जुना के. आर., आदिवासी विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आभार मानले.
दाव्यासाठी ३ वर्षांची मुदत अनुकंपा तत्त्वांमध्ये दावा करण्यासाठी आता तीन वर्षे मुदत आणि उमेदवार बदलण्याची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार पात्र ठरले आहेत. याचा फायदा कसा झाला, हेही जिल्हाधिकारी येरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान वन विभागात नवनियुक्त कर्मचारी ज्योती कोरडे आणि पोलीस विभागातील धनश्री टेकाम यांनी मनोगतही व्यक्त केले.

अनुकंपा नियुक्तीचे नियम सोपे : विभागीय आयुक्त सिंघल
विभागीय आयुक्त सिंघल यांनी, शासनाने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचे नियम सोपे केल्यामुळे पात्र उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात साधारणतः ४०० जणांना, तर अमरावती विभागात १ हजार १०० उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांसाठीचे सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला, तसेच त्यांनी सक्रीय योगदान दिल्यामुळे नियुक्त्या करणे शक्य झाले आहे. अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार चांगल्या पद्धतीने लोकाभिमुख कामे करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.













Users Today : 3
Users Yesterday : 11