February 7, 2026 8:42 am

अपघातग्रस्त विमानात 7 मराठी प्रवासी

4 क्रू मेंबर्स अन् 3 प्रवाशांचा समावेश

क्रू अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी

मुंबई  : 2 तासांपूर्वी

 

                        यासंबंधीच्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI171 विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावले होते. या विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केले. पण त्यानंतर 3-4 मिनिटांतच ते एका नागरी इमारतीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यात एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे या दुर्घटनेत शेकडो जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केबिन क्रू अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी

                         एअर इंडियाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते. त्यात 12 क्रू मेंबर्स व 230 प्रवासी होते. 12 एक क्रू मेंबर असणाऱ्या अपर्णा महाडिक (कर्मचारी संख्या: 80008872) या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल स्वतःही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. ते दोन तासांपूर्वी दिल्लीत लँड झालेत. त्यानंतर ते तत्काळ अहमदाबादला जाणार आहेत, असे महाडिक कुटुंबीयांनी सांगितले.
                         अपर्णा महाडिक यांच्याशिवाय महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशणी सोंघरे या 6 मराठी प्रवाशांचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे. पण त्यांची पुष्टी अद्याप झाली नाही. मैथिली पाटील (कर्मचारी संख्या: 80047429), दीपक पाठक (कर्मचारी संख्या: 81033187) व रोशणी सोंघरे (कर्मचारी संख्या: 80055146) हे तिघेजण अपर्णा महाडिक यांच्यासारखेच एअर इंडियाचे केबिन क्रू होते.

0
0

Leave a Reply

Realted News