अर्चना ढोके मृतावस्थेत आढळली कळमेश्वर रेल्वे स्टेशनवरच् मंगेश गमे यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार
का टा वृत्तसेवा Iसंजय श्रीखंडे
कळमेश्वर : गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या अर्चना सुनिल ढोके या महिलेचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातच आढळून आला. ती गेल्या अनेक दिवसापासून कॅंन्सरने पिडीत होती. विशेष म्हणजे, तीचा मृत्यू अंदाजे दोन दिवसांपूर्वी झाला असावा अशी चर्चा आहे. ती निपचीत पडून होती, मात्र कोणाच्याही लक्षात आले नाही.
अर्चना ढोके ही महिला तीच्या 9 वर्षीय मुलासह रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून राहत होती. काही महिन्यांपूर्वी ती स्थानिक गॅस कंपनीत कामावर होती, पण कॅन्सर झाल्यामुळे तीला नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यानंतर परिस्थितीने तीला रेल्वे स्टेशन परिसरात राहण्यास भाग पाडले.
दिनांक 20 जून 2025 रोजी तीचा मुलगा कु. वंश ढोके जेवण घेऊन परत आला असता, त्याची आई अर्चना त्याला आढळून आली नाही. तेव्हापासून ती बेपत्ता होती. अखेर आठवड्यानंतर, कळमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातच् तींचा मृतदेह आढळून आला.
येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश लिलाधर गमे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पोलिसांना माहिती दिली. कळमेश्वर पोलीसांच्या कायदेशीर कारवाईनंतर वरोडा येथे तीचे मृतदेहावर आज रोजी अंत्यसंस्कार केले. मंगेश गमे व कळमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णाजी बगडे यांच्या पुढाकाराने अर्चना ढोके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारला नायब तहसीलदार तडसे , वरोडा ग्रामपंचायत सरपंचासह, सदस्य नागरिक यांची उपस्थिती होती.
आई वडिलांचे छत्र हरविलेला 9 वर्षीय वंश च्या रूपाने समाजातील अतिशय विदारक वास्तव समाजासमोर समोर आले आहे. कु. वंश ढोके या चिमुकल्यासाठी शासन काय ते करेलंच्, परंतू समाजातून किती हात पुढे येतील? या चिमुकल्याचं जगणं सहज करू या! सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (संपर्क : मंगेश गमे/ संजय श्रीखंडे)