आमदार डॉ. आशिष देशमुख यांची सावनेरमध्ये
‘खऱ्या अर्थाने’ गोरगरीबांसोबत दिवाळी
काटा वृत्तसेवा I सावनेर : दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि फटाक्यांचा उत्सव नाही, तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि समजूतदारपणाचा सण असतो. हीच भावना साकारणारे दुर्मीळ उदाहरण ठरले आहे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे सावनेरमधील दिवाळी साजरीचे दृश्य. समाजातील गोरगरीब, बेघर, दुर्लक्षित कुटुंबांना त्यांनी केवळ मदत केली नाही, तर त्यांना आपल्या घरातील सदस्यांसारखे आपलेसे करून प्रेमाने दिवाळी साजरी केली.
सामान्यांसाठी दिवाळीचा दीप उजळवणारे ‘लोकप्रतिनिधी’
डॉ. देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. आयुश्री देशमुख यांनी सर्वप्रथम बाजारातून खरेदी करत सामान्य माणसासोबतचा आपुलकीचा धागा घट्ट केला. गरजू महिलांना साडी, लहानग्यांना फटाके आणि कुटुंबांना दिवाळी किटचे सप्रेम वाटप करत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.
पण याहूनही मोठे पाऊल म्हणजे – 40 वर्षांपासून अतिक्रमणाच्या जागांवर राहणाऱ्या अनेक कुटुंबांना मालकी हक्काचे पट्टे देऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आणि सन्मानाचे नवसंजीवन दिले.

नेता नाही, तर ‘पिता’समान आधार
हे केवळ राजकारण नव्हते, ही होती एक भावनिक बांधिलकी. आमदार देशमुख यांनी स्वतः हजर राहून या लोकांना हक्काचे मालक बनवले, त्यांच्या आयुष्याला अर्थ आणि स्थैर्य दिले. दिवाळीचा खरा अर्थ त्यांच्या कृतीतून प्रकट झाला – एक गरीब कुटुंबाचा चेहरा उजळणे म्हणजेच दिवाळी.
“सावनेर-कळमेश्वर हे माझं कुटुंब आहे. त्यांच्या सुख-दुःखात मी सदैव सोबत राहीन. शेतकऱ्यांच्या समर्पणाने आणि जनतेच्या प्रेमानेच ही दिवाळी खरी समृद्ध होईल,” असे उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हा आदर्श इतरांनी घ्यावा…
आज जेव्हा बरेचसे नेते केवळ सोशल मीडियापुरती मदतीची नाटके करतात, तेव्हा आमदार आशिष देशमुख यांचे हे कार्य एक प्रत्यक्ष कृतीतील प्रेरणा ठरते. श्रीमंत, सक्षम आणि पदाधिकारी यांनीही यातून आदर्श घेत सामाजिक बांधिलकी जपावी, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला आहे.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे आदी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Users Today : 0
Users Yesterday : 11