कळमेश्वर तालुक्यातील दोन ग्रामपंचायती सन्मानित
चार ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचा गौरव
का टा वृत्तसेवा I विजय नागपुरे
कळमेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागातर्फे आयोजित आर. आर. (आबा) पाटील सुंदर गात स्पर्धेत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना नुकतेच सन्मानित करण्यात आले. सोबतच आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून चार अधिकाऱ्यांचा जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीत तालुक्यातील पिपळा (किनखेडे) व कनियाढोल ग्रामपंचायतीचा सहभाग असून, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त मोहीम, महिलांचा सहभाग, शाश्वत विकास तसेच ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग, आदी निकषांवर मूल्यांकन करण्यात आले होते. या सर्व निकषांमध्ये या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली. पिपळा (किनखेडे) ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल फुलारे, ग्रामपंचायत अधिकारी भैयाजी उके तसेच कनियाढोल ग्रामपंचायतीचे सरपंच लाल मोहम्मद मालाधारी व ग्रामपंचायत अधिकारी सरोजिनी गावंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून हर्षा चरपे, प्रकाश धोटे, ओंकार तागडे, विक्रांत आखाडे यांना सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, सहायक गटविकास अधिकारी प्रगती जगताप, पंचायत विस्तार अधिकारी बबन श्रृंगारे, कृषी अधिकारी विठ्ठल थूल, कृषी विस्तार अधिकारी सुजाता रामटेके, अभियंता रिषभ गजभिये, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ऋचिका भोयर, नरेगाचे अविनाश सावरकर, चंद्रमणी मनवर, मनोज चामाटे, संजय धोटे, लुकेश राणे, महेश ढोक, कांतेश्वर टेकाडे, प्रफुल्ल डेहनकर यांनी अभिनंदन केले आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 11