December 1, 2025 7:30 am

इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा :

तरुणीची सोनसाखळी हडपून केला लैंगिक अत्याचार

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : तरूणीशी इन्ट्राग्रामवर ओळख निर्माण करून तिला लॉजवर नेऊन तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी पहाण्यास घेऊन ती परत देण्यासाठी तिला शरीर संबंधात भाग पाडणार्‍या व नंतर तिचा गर्भपात घडवून आणणार्‍या एकावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ विलास धोत्रे (२५, रा. वडत्तरवाडी, दिपबंगला चौक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २१ वर्षीय तरूणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार मे २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला.
                        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२४ मध्ये फिर्यादी आणि तरूणीची इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली. त्यातून त्याने तरूणीला भेटण्यास बोलवून तिला एका लॉजवर नेले. तेथे तिला तिच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सेानसाखळी पहाण्यास मागीतली. त्यानंतर ती सोनसाखळी परत करण्यासाठी त्याने तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर लैंगिक अत्यार केले.

                         यानंतर तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीने तिची सोनसाखळी परत न केल्याने त्याने तिच्यासोबत बोलणे बंद केल्याणे व भेटणे बंद केल्याने त्याने तरूणीचा बनावट इन्ट्राग्राम आयडी तयार केला. त्यावरती तरूणीचे व आरोपी सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने तरूणीच्या वडीलांच्या दुकानावर जाऊन ७० हजार रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आरोपीने त्याचे आणि तरूणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

बसमधून उतरताना ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरी 

                         बसमधून उतरताना ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरी करून नेल्याचा प्रकार स्वारगेट ते खडकी रेल्वेस्टेशन दरम्यान २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता घडला. यावेळी महिलेची ५५ हजारांची बांगडी चोरीला गेली. याबाबत शोभना मंगलदास कुटे (६१, रा.मु. पो. कुर्टी, करमाळा, सध्या रा. लोहमार्ग पोलिस वसाहत, खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

                         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ह्या बसमधून जात असताना शेजाराी बसलेल्सया महिलांना खाली उतरायचे असल्याने तक्रारदार महिला उभी राहिली. त्यावेळेस त्यांच्या पुढे तीन महिला बस मधुन राहिल्या त्यावेळेस त्यांच्या पुढे तीन महिला बसमधुन उतरण्यासाठी थांबल्या होत्या. याचवेळी तक्रारदारांचे असताना त्यांच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती थांबला होता. त्या बसमधून उतरून घरी गेल्या असता त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी दिसून आली नाही. तेव्हा महिलेनी बसस्टॉप ते घरी जाणार्‍या रस्त्यावर शोध घेतला असता बांगडी सपडली नाही. त्यानंतर त्यांनी बांगडी चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News