शिवसेना उबाठा आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बुलडाणा : (दि. 27) : अतिवृष्टी आणि ढगफुटीने मायबाप शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पंचनामाचे सोपस्कार होत राहतील. त्याआधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यासह हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने मदत शेतकऱ्यांना द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दि. २७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर डीपीडीसी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. त्यामुळे काहीकाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, राज्य प्रवक्ता जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख छगनमेहत्रे, वसंतराव भोजने, डी.एस. लहाने, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, जिल्हा संघटक सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, लखन गाडेकर, किसन धोंडगे, तुकाराम काळपांडे, सुनील घाटे, संजय वडतकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, या सरकारचं करायचं काय’
अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या
पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिक झाले आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर चढण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पालकमंत्र्यांची भेट आम्हाला घ्यायची आहे, अशी भूमिका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे डीपीडीसीच्या बैठकीदरम्यान पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला. त्यानंतर शिवसैनिक शांत झाले.











Users Today : 0
Users Yesterday : 11