कळमेश्वरात “एक पृथ्वी – एक आरोग्य” या वैश्विक विचाराला समर्पित योग दिन साजरा

आ. डाॅ. आशिष देशमुख यांचे उपस्थितीत कळमेश्वरात योग दिन संपन्न

का. टा. वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर: ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. नागरिकांच्या सर्वच थरातून उत्स्फूर्त सहभागाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात योगाभ्यास, आणि सर्वत्र आरोग्यविषयक जागरूकतेची सकारात्मक ऊर्जा यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने स्मरणिय ठरला.
आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
                        या सामुहीक योगभ्यासात मोठया संख्येने विद्यार्थी, महिला-पुरूष, जेष्ठ नागरिक, शहर व परिसरातील गावांमधूनही मोठया प्रमाणावर नागरिकांनी उस्फुर्तपणे आपला सहभाग नोदविला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणारे चारही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पोलीसांचा चोख बंदोबस्त दिसून आला.रस्त्यावर हजारोंच्या संख्येत नागरिकांनी योगाभ्यास केला.
आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
                             या योग दिनाच्या यशस्वी आयोजनाते अरविंद सहकारी बँक लि., कळमेश्वर शाखेचे विशेष योगदान राहिले. आरोग्य, सामाजिक जाणीव आणि जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवण्याच्या दृष्टीने संस्थेची सामाजिक बांधिलकी निश्चितच उल्लेखनीय आहे. अशा उपक्रमांतून लोकांपर्यंत आरोग्याचे आणि सकारात्मकतेचे बळ पोहोचवण्याचे कार्य भविष्यातही अधिक व्यापकपणे सुरू राहील. याची ग्वाही आ. डाॅ. आशिष देशमुख यांनी दिली. कार्यक्रमात स्थानिक जेएसडब्लू इस्पात कं. चा सहभाग असल्याचेही निदर्शनात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
                             याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, प्रकाश वरूळकर, कृष्णाजी बगडे, निर्मल श्रीखंडे, महादेव इखार, स्मृती इखार, धनराज देवके, मेघराज नवले, संदीप उपाध्ये, प्रमोद हत्ती, प्रतीक कोल्हे, ईश्वर पवार, गंगाधर नागपुरे, प्रभाकर प्रधान, प्रविण सुके, प्रजापिता ब्रम्हकुमारी, नगर परिषद मुख्याधिकारी आकाश सुरडकर, कळमेश्वर पं- स- गटविकास अधिकारी  अंशुजा गराटे, कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने, स्मृती इखार, मनीषा लंगडे, रंजना देशमुख, मंगेश कोठाडे, मुकेश पराडे, मोठया संख्येने शासकिय कर्मचारी, जेएसडब्लू कंपनीचे अघिकारी दिलीप गजभिये, कर्मचारी, विवीध शाळांचे विद्यार्थी-शिक्षक व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने आपला सहभाग नोदविला.
आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन



0
0

Leave a Reply

Realted News