कळमेश्वर एमआयडीसी कामगार संयुक्त कृती समितीचे ध्वजारोहण
का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे
कळमेश्वर : येथील स्थानीय औद्योगिक परिसरातील एमआयडीसी असोसिएशनच्या प्रांगणात, १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण व विशेष कार्यक्रमाचे आयोजन कामगार संयुक्त कृती समितीचे वतीने करण्यात आले होते. यावेळी ध्वजारोहण कामगार कृती समितीचे अध्यक्ष संजय इखार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे उपाध्यक्ष व कामगार प्रतिनिधी केशव वंजारी होते.
यावेळी कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करून समस्या समितीच्या वतीने निकाली काढून कामगारांवर अन्याय करणाऱ्या कारखानदाराविरुद्ध कठोर पाऊले उचलून न्याय मिळवून देण्यात येईल. असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी कामगारांना केले. तसेच कामगारदिनी संघटनेच्या वतीने शाहील चोखंद्रे, भिमराव शेंडे, प्रल्हाद मंडलिक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
छायाचित्रात कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय इखार ध्वजारोहण करताना व कामगार वर्ग
कार्यक्रमाचे संचालन व आभार कृती समितीचे उपाध्यक्ष केशव वंजारी यांनी मानले. याप्रसंगी इंद्रजीत भुजाडे, शामु चोखादरे, रामू खंडाळ, गणेश बोकडे, अनिल नितनवरे, विनोद शेंडे, दत्तराज श्रीखंडे, सिद्धार्थ जामगडे, दिलीप इंगळे, संजय धोटे, भीमराव शेंडे, सुधाकर गोतमारे, दिलीप इंगळे, बालाजी धकाते, सुभाष फुके, सुनील नागपुरे, निर्मला माशलकर, कैलास फुलझेले, गणेश बोकडे, राजू मानवटकर आदींसह मोठया संख्येने कामगारवर्ग उपस्थित होता.
















Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0