धम्माचारी लोकनाथ यांनी ध्यानसाधना घेतली
काटा वृत्तसेवा: संजय श्रीखंडे
कळमेश्वर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती मंडळ कळमेश्वर तर्फे भगवान बुद्धाच्या 2588 व्या जयंतीचे आयोजन बाबासाहेब केदार सभागृहात करण्यात आले. या जयंतीच्या निमित्ताने पहिल्या सत्रात सकाळी 6 वाजता धम्माचारी लोकनाथ यांनी ध्यानसाधना घेतली व मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात बालकांचे गीतगायन, वक्तृत्व व नृत्य सादरीकरण झाले. या सत्राचे संचालन सुकेशिनी रामटेके यांनी केले. सायंकाळच्या सत्रात भदंत सोमानंद राष्ट्रीय प्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नवी दिल्ली व भिखुनी प्रवज्जा मध्यप्रदेश प्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांनी धम्मादेसना दिली. तदनंतर सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मंडळाचे अध्यक्ष भरत भोंगाडे, उपाध्यक्ष चार्वाक खैरे, सचिव कृष्णाजी शेंडे, कोषध्यक्ष डॉ राजेंद्र ढवळे, सदस्य दिपक तागडे, राम बुरबुरे, नेतराम राऊत, हरिदास इंगळे, युवराज शेंडे, मेघश्याम ठमके, चुडामन उके, शिशुपाल मडके, शिशिर बनसोड,विष्णु कळमकर, शेखर सोमकुवर, दिपक सोमकुवर यांनी यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केले.











Users Today : 3
Users Yesterday : 11