कळमेश्वर: नुकतीच् शुक्रवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना पक्षाची कळमेश्वर ब्राम्हणी शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
शिवसेना पक्षाचे (उ.बा.ठा.गट) नागपूर जिल्हाप्रमुख उत्तम कापसे मधुकरराव दळवी, विनोदजी जिवतोडे, सुरेश लंगडे यांचे प्रमुख उपस्थितीत राजेश बोरकर यांची शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
गुडू इम्रान पठाण, तालुका उपप्रमुख, प्रदीप कट्यारमल व विलास बारमासे, उप शहर प्रमुख तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून अनिल चवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुका प्रमुख बाळुभाऊ जाचक, उप तालुका प्रमुख विजय वाघधरे, माजी नगरसेवक थानसिंग पटले, किशोर तुरकर, देवेंद्र भोरकर, बळवंता मानकर, विष्णु ईखार, मुकेश ढोले, कमलाकर मानकर, प्रविण शिरभाते, हंसराज गवळी, नंदुजी आगलावे, वृषभ रावुत, सतिश भराडे, निखिल कटायरमल, संतोष देवमुरार, सतिश बोबडे, रामेश्वर कामडी याप्रसंगी उपस्थित होते.
आता होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन शिवसेनेचे नागपूर जिल्ह्याचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश लंगडे यांनी केले आहे.