कामठीत पोलीसांनी उधळली ‘‘रेव्ह पार्टी’’, मुंबईतील चार ‘‘झिंगाट’’ तरुणीसह आठ अटकेत,

नागपुरात ड्रग्ज पार्टीवर धाड;

पोलिसांनी केला 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

काटा वृत्तसेवा : क्राइम रिपोर्टर
नागपूर :  गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग व एएचटीयू पथकाने नवीन कामठीतील फार्महाउसवर धाड टाकून ‘‘रेव्ह पार्टी’’ उघडकीस आणली. यात चार महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका बिल्डरसह चैघांना अटक केली. या ठिकाणी पोलिसांना चार तरुणीही अती प्रमाणात झिंगलेल्या आढळल्या. पोलिसांनी त्यांनाही चैकशीसाठी ताब्यात घेतले. चैघीही मुंबई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी ड्रग्ज, हुक्का आणि इतर अमली पदार्थांचे साहित्य तसेच महागडे मोबाइल फोन आणि दोन आलिशान गाड्यांसह २६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.
                       गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शनिवारी मध्यरात्री एस. फार्महाऊस, आशा हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकूनसुनील शंकरलाल अग्रवाल (वय ६१, रा. रामलक्ष्मी कॉलनी, कामठी), गौतम सुशील जैन (वय ५१, रा. रामदासपेठ), नीलेश बाबुलाल गडिया (वय ६१, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ) आणि मितेश मोहनलाल खक्कर (वय ४८, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एक जण बिल्डर असून, सुनील आणि त्यांचे दोन मित्र प्राॅपर्टी डिलर आहेत.

                        पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कामठी येथे सुनील अग्रवाल याचे ‘‘एस फार्म’’ नावाचे फार्महाउस आहे. (शनिवारी रात्री) सुनीलने फार्महाउसवर रेव्ह पार्टीचे आयोजन केले. यासाठी मुंबईतून खास चार तरुणी बोलाविण्यात आल्या. या ठिकाणी एमडी, हुक्का व मद्याचीही व्यवस्था करण्यात आली. फार्महाउसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर यांना मिळाली. माकणीकर, साहाय्यक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, ललिता तोडासे, साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज घुरडे, हेड काॅन्स्टेबल विजय यादव, मनोज नेवारे, शैलेश डोबोले, पवन गजभिये, विवेक अढाऊ, रोहित काळे, अनुप यादव, व त्यांच्या सहकार्यांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास फार्महाउसवर छापा टाकला.
                        याव्यतिरिक्त अटक केलेल्या इतर आरोपींच्या ताब्यातून  विविध कंपन्यांचे सहा महागडे अँड्रॉइड मोबाइल फोन, दोन आलिशान चारचाकी गाड्या (अंदाजित किंमत २२ लाख रुपये) आणि ५८,००० रुपये रोख रक्कम असा एकूण २७ लाख ७७० रुपयांचा पोलिसांना १.३१ ग्रॅम एमडी, हुक्क्याचे साहित्य व दारूच्या बाटल्या आढळल्या. चैघांविरुद्ध नवीन कामठी पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सुनील अग्रवाल याला एमडीचा पुरवठा कोणी केला याचा शोध पोलिस घेत आहेत.मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
                       याप्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ड्रग्ज पार्टीमागे आणखी कोण सामील आहे आणि या ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता याचा तपास पोलिस करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तस्कारांविरुद्ध मोहीम सुरूच

पोलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी अमली पदार्थमुक्त शहर अभियानासाठी ड्रग्ज तस्करांची धरपकड करण्यासह कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी तस्करांविरुद्ध कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत पोलिसांनी तब्बल १०३ तस्कारांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वा कोटीचे ड्रग्ज जप्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News