कारंजा येथे भव्य महाआरोग्य व नेत्रतपासणी शिबिर
दीड हजार नागरिकांनी घेतला लाभ
आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा : ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर व राष्ट्रीय युवा उदय संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्व. राजीव गांधी मेमोरियल इंग्लिश हायस्कूल येथे आयोजित महाआरोग्य व नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा तब्बल १५०० नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध तपासणी कक्षांना भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
५१ मोतीबिंदू रुग्णांसह ११७ रुग्णांना पुढील उपचार
शिबिरात तपासणीदरम्यान ५१ मोतीबिंदू रुग्ण व इतर आजाराचे ११७ रुग्ण आढळून आले असून, त्यांना पुढील उपचाराकरिता शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथे नेण्यात येणार आहे.
विविध तज्ज्ञ डॉक्टरांची मोफत सेवा
शिबिरात औषधोपचार, हृदयरोग, किडनीरोग, मेंदूरोग, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग व मुखरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी व मार्गदर्शन केले.
रक्तदाब व मधुमेह तपासणीसह मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रथम येणाऱ्या ३०० नेत्ररुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणाताई चाफले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पियुष चाफले, डॉ. राजू मिश्रा, डॉ. संजय उगेमुगे, डॉ. पंकज कन्नमवार, शिरीष भांगे, राजेंद्र वंजारी, सुदीप भांगे, हरिभाऊ धोटे, जनार्दन धोटे, विलास वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्व. राजीव गांधी मेमोरियल इंग्लिश हायस्कूल व ए.आर.सी. पब्लिक स्कूलच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
सूत्रसंचालन प्रदीपकुमार ऊके व निशा धुर्वे यांनी केले, तर आभार रजनी धांदे यांनी मानले.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0