“माझी माऊली फाउंडेशन”च्या माध्यमातून 600 मुलींचे निःशुल्क HPV लसीकरण
का टा वृत्तसेवा/ सावनेर : “सुदृढ मुलीच भविष्यातील सशक्त महिला बनतील आणि सशक्त स्त्रिया या सशक्त समाजाचा पाया आहेत. परिसरातील प्रत्येक मुलगी निरोगी व मुक्त राहून तिला चांगल्या शिक्षणाची संधी सहज मिळावी, याला आमचे प्रथम प्राधान्य आहे”, असे मत माझी माऊली फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आयुश्री आशिष देशमुख यांनी म्युनिसिपल हायस्कूल सावनेर येथे आयोजित सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
पोलीस उपअधीक्षक अनिल मस्के, हेल्थ ट्री फाउंडेशनच्या डॉ. दीपिका चंडोक, श्री.अभिषेक चावला, माझी माऊली फाउंडेशनचे समन्वयक सोनू नवधिंगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर विधानसभा मतदारसंघातील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निर्मूलन मोहिमेंतर्गत पहिले लसीकरण शिबीर संपन्न झाले.









