दर्यापूर काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
अमरावती : राज्य शासनाने नुकत्याच पारित केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात येथे प्रचंड निदर्शने करण्यात आली. तालुका ग्रामीण काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात तालुका काँग्रेस कमीटीचेअध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांना निवेदन देण्यात आले.
हा कायदा धोकादायक असून तो लोकशाही मुल्यांचा आणि भारतीय संविधानाने हमी दिलेल्या नागरी हक्कांच्या व स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. या कायद्याच्या तरतुदी सर्वसमान्य नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलनाचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या असुन त्यामुळे लोकशाही व्यवस्थेचे मूलभूत तत्व धोक्यात येण्याची भीती आहे. ह्या कायद्यानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने या कायद्याच्या व्यापक आणि अस्पष्ट व्याख्येमुळे सरकारविरोधी टीका, लेखन, किंवा शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना व संघटनांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा २४-२५ तात्काळ रद्द करण्यात यावा, त्याचवेळी नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंदोलनाचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली.
निवेदन देतेवेळी सुनील पाटील गावंडे, ईश्वर बुंदेले, संजय बेलोकार, आतिश शिरभाते, गजानन देवतळे, अस्लम मन्सुरी, दिलीप गावंडे, राजेश खेडकर, महेश कुरळकर, दिनेश चव्हाण, शिवा इंगळे, दादाराव इंगळे, दीपक मालखेडे, कालू भाई, बबलू कुरेशी, राजेश राठी, रामेश्वर तांडेकर, मंगल बुंदेले, नितीन गावंडे, जम्मूभाई पठाण, आरिफ भाई, साहेबराव भदे, ॲड. निशिकांत पाखरे, दत्ता कुंभारकर, सागर काळे, प्रतीक बुंदिले, वैभव मालखेडे, नारायण ठाकरे आदी उपस्थित होते.
![]()
![]()